प्रेम म्हणजे काय असते,
गुलाबाचे फूल असते,
तोडताना तोचतात काटे
पण सुघंधातसुधा तेवढीच मजा असते.
प्रेम म्हणजे काय असते,
आयुष्यभराचा मैत्रीचा प्रवास असते,
कितीही चालले तरी सम्पत नाही पण थोडा जरी उशीर झाला तरी हाती मात्र काहीच उरत नाही..
प्रेम मणजे काय असते.
वातीणे दिव्याला दिलेली साथ असते,
आहे तुझयात जोवर तेल तोपर्यंत जळत राहील माझा वेल असे ते वचन असते,
प्रेम म्हणजे काय असते,
संध्याकाळची पक्ष्यांची किलबिल असते,
आई लवकर ए घरा असा त्या पिलानी दिलेला तो निरोप असते.
प्रेम म्हणजे काय असते,
प्रेयसिने हाती दिलेला हात असते.
तिने मागितलेली आयुष्यभराची साथ असते...
प्रेम म्हणजे काय असते,
गोठ्यातल्या गाईचे हंबरने असते,
तिने दिलेली तिच्या वासराला ती हाक असते..
.................................दिनू
No comments:
Post a Comment