प्रेमाचा हा प्रवास असाच सुरू असावा. हात तुझा सदा माझया हाती असावा
तुझया प्रेमाची ऊब नेहमी या हरदया मिळावी,
क्षणभर सुधा तू दूर न जाविस.
माझया नजरेला तुझी नजर मिळावी.
मनातले भाव सगळे डोळ्यातून बोलावे.
तुझया गालावरची लाली अझुन रंगावी.
अशी ती संध्याकाळ कधीच न संपावी.
सगळे दुख: विसरून तू माझया मिठीत यावेस.
माझया या थकलेल्या मनाला आधार तू द्यावास.
निरागस रूप तुझे मी निहाळताच राहावे
रात्रीच्या चांदण्यासारखे गोड हसू फक्त तुझयाच गाली बघावे.
.............................................
प्रेमाचा हा प्रवास असाच सुरू असावा. हात तुझा सदा माझया हाती असावा.
...........दिनू
No comments:
Post a Comment